Share

पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…

Published On: 

पुणे : पीएमआरडीएच्या निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले आणि आज त्याचा निकालही जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने 30 पैकी 14 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागवला आहे. मात्र, काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

पीएमआरडीएच्या पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी बुधवारी मतदान झाले होते. एकूण 30 जागांसाठी हे मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तिसरी आघाडी झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. तर आघाडीचा फायदा भाजपला झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसने बंडखोरी करून उमेदवार दिला होता. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपने 14 जागा पटकावल्या आहेत. तर राष्ट्रवादीने 8 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेलाही यश आलं आहे. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर एकच जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेटवर जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांचं अभिनंद करून विजयाचा गुलाल उधळला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!