🕒 1 min read
एंटिगा : वेस्ट इंडिजने पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेचा 8 विकेटने पराभव केला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगसाठी उतरलेल्या श्रीलंकेचा 49 ओव्हरमध्ये 232 रनवर ऑल आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना शाय होपने 110 रनची खेळी केली. होपशिवाय एव्हिन लुईसनेही 65 रनची खेळी केली. पण या मॅचनंतर पोलार्डवर टीका होत आहे. श्रीलंकेचा बॅट्समन दानुष्का गुणतिलकाला आऊट करताना पोलार्डने जी पद्धत वापरली, त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
दानुष्का गुनाथिलकावर रनआऊटपासून वाचण्याकरिता जाणून बुजून चेंडू अडवल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे थर्ड अंपायरने दानुष्काला (फिल्डिंगमध्ये अडथळा आणणे) आऊट घोषित केलं. थर्ड अंपायरच्या याच निर्णयावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. श्रीलंकेच्या बॅटिंगवेळी 22 व्या ओव्हरदरम्यान दानुष्का बॅटिंग करत असताना त्याने एक शॉट खेळला. शॉट खेळून रन्स घेण्यासाठी तो क्रीजच्या बराच पुढे आला होता. त्यावर दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या बॅट्समनने रन्स घेण्यास नकार दिला. त्यानंतर क्रीजमध्ये परत येण्यादरम्यान त्याच्या पायामध्ये बॉल घुटमळला.
This rare dismissal has sparked outrage. Surely it wasn't deliberate! ????????
MORE: https://t.co/roxIfLJm8E
????@windiescricket pic.twitter.com/CRcYmk2l08
— Fox Cricket (@FoxCricket) March 11, 2021
हा सगळा प्रकार पाहून वेस्ट इंडिजचा किरन पोलार्ड भडकला. त्याने झाला प्रकार बरोबर नाही, असा इशारा करत जोरदार अपील केली. मैदानावरच्या पंचानी हे प्रकरण थर्ड अंपायरकडे सुपूर्द केलं. थर्ड अंपायरने फिल्डिंगमध्ये अडथळा आणला म्हणून दानुष्काला आऊट घोषित केलं.
Danushka Gunathilaka has been given out Obstructing the field. Very difficult to interpret if this was a wilful obstruction. Looks unintentional but has been given out as per the lawspic.twitter.com/CJh3GmzvaN
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) March 10, 2021
महत्वाच्या बातम्या
- स्त्री शक्तीचा अपमान केल्याचा आरोप होत असलेले कॉंग्रेस नेते भुपेंद्र सिंह हुडा यांनी नेमकं काय केलंय ?
- लसीचे दोन डोस घेऊनही जालन्यात दोन आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
- विदर्भ मराठवाड्यावर अन्याय सुरूच… वैधानिक महामंडळासह वॉटरग्रीड योजना बारगळली
- भारत आता हुकुमशाही असलेला देश बनला आहे’; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप
- मीच सर्वोत्कृष्ट खेळाडू ; राजस्थान रॉयल्सच्या प्रश्नावर जडेजाचं भन्नाट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
