🕒 1 min read
अहमदाबाद : शुक्रवारपासून सुरु होणारी इंग्लंड विरोधातील टी20 सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. रवींद्र जाडेजा अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. अशातच आपल्या दुखापतीतून सावरल्यानंतर जाडेजाने पुन्हा एकदा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर रवींद्र जाडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी करताना दिसला.
सध्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असलेला जडेजा सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव आहे. नुकताच राजस्थान रॉयल्स संघाच्या ट्विटर हँडलवर २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जडेजाने खूप मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/CMMwYL_Kdyl/?utm_source=ig_web_copy_link
राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रश्न विचारण्यात आला होता की,२०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल त्यावर जडेजाने स्वतःचेच नाव लिहिले आहे. जडेजाची ही प्रतिक्रिया पाहून चाहत्यांना हसू आवरले नाही. रवींद्र जडेजाने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर राजस्थान रॉयल्सनेही त्याला प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले की ‘अशाप्रकारे चर्चा थांबली’.
महत्वाच्या बातम्या
- चिंताजनक! सातारा डोंगराला पुन्हा आग
- अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हजारांच्या जवळ, नऊ कोरोनबाधितांचा मृत्यू
- परभणीमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू
- मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर अवलोकन बैठक घ्या-राजेंद्र दाते पाटील
- #MPSC : आ.गोपीचंद पडळकर, राम सातपुते यांना पोलिसांकडून अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
