Share

भारत आता हुकुमशाही असलेला देश बनला आहे’; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप

Published On: 

दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच सोशल मिडियाच्या माध्यमातून अथवा भाषणातून मोदी सरकारवर घणाघाती टीका करत असतात. मोदी सरकारवर टीका करण्याची संधी राहुल गांधी कधीच सोडत नाही. यावेळी देखील राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाण साधला आहे.

भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, अस म्हणत राहुल गांधींनी त्यासोबत स्वीडनमधील एका इन्स्टिट्यूटचा डेमोक्रसी रिपोर्टचा हवाला दिला आहे. भारत आता हुकुमशाही असलेला देश बनला आहे, जितका पाकिस्तान आहे, तसंच या रिपोर्टमध्ये भारत हा बांगलादेशपेक्षाही खराब असल्याचं त्यांनी ट्वीट केले आहे.

त्यांच्या या ट्वीटमुळे अनेकांनी प्रतिउत्तर दिले आहे. तसेच यावेळी भाजपकडून देखील राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. यावर भाजप नेते राकेश सिन्हा उत्तर देत म्हणाले की, पश्चिमात्य देशातील नवसाम्राज्यवादी शक्तींना भारताची वाढती ताकद, प्रतिष्ठा आणि विश्वसनियता सहन होत नाही. त्यांच्यासाठी भारतातील एका एजंटच्या रुपात राहुल गांधी काम करत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!