Share

स्त्री शक्तीचा अपमान केल्याचा आरोप होत असलेले कॉंग्रेस नेते भुपेंद्र सिंह हुडा यांनी नेमकं काय केलंय ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- कॉंग्रेस नेते भुपेंद्र सिंह हुडा हे गेले काही दिवसात एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये महिला दिनाच्या दिवशी काँग्रेस नेते भुपेंद्र सिंह हुडा यांनी स्वत: ट्रॅक्टरमध्ये बसून तो ट्रॅक्टर महिलांना ओढायला लावला होता. महिला दिना दिवशीच स्त्री शक्तीचा अपमान करून त्यांना अमानवी वागणूक देणारे भूपेंद्र सिंग हुडा यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महिला आयोगाने हुडा यांच्यावर कडक कारवाई करावी अशी देखील मागणी होत आहे.भुपेंद्र सिंह हुडा यांच्या या अमानवी कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी देशभर आंदोलने केली जात आहेत.या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात देखील पोहचले असून महाराष्ट्रामध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद सह राज्यभरात ही आंदोलन करण्यात आले.

खापरे म्हणाल्या की, भुपेंद्र सिंह हुडा यांनी महिलांना ट्रॅक्टर ओढायला लावणे हे कृत्य अमानवी आणि स्त्री शक्तीचा अपमान करणारे आहे. महिला दिनी आंदोलनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा गैरवापर करणारे त्यांचे हे कृत्यच मुळात लज्जास्पद आहे. भुपेंद्र सिंह हुडा यांनी तात्काळ महिलांची माफी मागावी व महिला आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत असताना एका ज्येष्ठ नेत्यांच्या अशा वर्तणुकीवर काँग्रेस नेत्या गप्प कशा बसू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याच मुद्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर राज्याचा बजेट सत्राच्या दरम्यान भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. खट्टर म्हणाले की, काँग्रेस नेता भूपेंद्र सिंह हुड्डा निदर्शनादरम्यान एका ट्रॅक्टरवर बसले होते आणि पक्षाच्या महिला आमदार वाहनाला दोरीने ओढत होत्या. मला हे पाहून खूप दु:ख झाले. खट्टर यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं यावेळी दिसलं.

अश्रू आवरत पुढे खट्टर म्हणाले की, मी मोठ्या जड मनाने एक गोष्ट सांगू इच्छितो. महिला दिनाच्या दिवशी संपूर्ण जग याला उत्साहाने साजरे करत होते. विधानसभेचे संपूर्ण सत्रही महिलांप्रति समर्पित करण्यात आले होते. पण, जेव्हा मी टीव्हीवर पाहिलं तेव्हा मला अती दु:ख झालं. वेठबिगार मजुरांपेक्षा वाईट व्हवहार महिलांसोबत केला जात आहे. मी रात्री झोपू शकलो नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!