🕒 1 min read
जालना : जिल्ह्यात गुरुवारी २०४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीन आरोग्य अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आरोग्य यंत्रणेचे नेतृत्व करत कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, प्रभावी व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेऊनही डॉ. भोसले व डॉ. कडले यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मात्र, असे असले तरीही कोरोना महामारीला थोपवण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळणे आणि लस घेणे हे प्रमुख उपाय आहेत. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील निर्बंध कडक केले आहेत.
३२ हजार जणांनी घेतली लस
जालना येथे आतापर्यंत ३२ हजार ३१२ जणांनी लस घेतली आहे. गुरुवारी महाशिवरात्रीचा सण असतानासुद्धा ८ शासकीय आरोग्य संस्था व ७ खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन ५३४ लाभार्थींनी ही लस घेतली. दरम्यान, आतापर्यंत १६ हजार २६० आरोग्य कर्मचारी, ६ हजार ९८५ फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ ते ६० वयाच्या २ हजार १३४ तर ६० पेक्षा अधिक वयाच्या ६ हजार ९३३ अशा एकूण ३२ हजार ३१२ जणांनी लस घेतली.
जिल्ह्या सध्या १ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू
जालना जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४१६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १५ हजार ७१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २९७ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून वृद्धाची ७० हजारांची फवणूक
- अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हजारांच्या जवळ
- पतीच्या नात्यातील तरुणाचा महिलेवर अत्याचार; आरोपीला ४ दिवसांची पोलिस कोठडी
- मनपा प्रशासकांनी शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी : आमदार बागडे
- मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर अवलोकन बैठक घ्या-राजेंद्र दाते पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
