मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानात विराट नेहमीच आक्रमक दिसतो. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला विराट कोहली मैदानात खूपच आक्रमक असायचा. पण काही काळानंतर त्याचा त्याचा आक्रमकपणा कमी झालेला दिसत आहे. पण मैदानाबाहेर विराट खूपच शांत असल्याची माहिती बॉलीवूड अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्माने दिली आहे.
आपल्या फलंदाजीने करोडो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या विराटने आपल्या आयुष्यात आणि स्वभावात झालेल्या बदलाचं पूर्ण श्रेय पत्नी अनुष्का शर्माला देतो. विराटने अनेकदा ही गोष्ट बोलूनही दाखवली आहे. अलीकडेच विराट-अनुष्का पहिलांदा आई-बाबाही झाले आहेत. एका मुलाखतीत अनुष्कानं म्हटलं होतं की, विराट मैदानावर जितका आक्रमक आहे, तितकाच तो मैदानाबाहेर शांत आहे.
2019 सालच्या फिल्मफेअर कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना अनुष्काने पती विराट कोहलीविषयी अनेक बाबी उघडपणे सांगितल्या होत्या. विराट कोहली त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण अनुष्काला असा विश्वास आहे की, तो केवळ मैदानावरच आक्रमक असतो. कारण विराटचं क्रिकेटवर खूपचं जास्त प्रेम आहे. अनुष्काने आपल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘मैदानाबाहेर विराट खूपच शांत असतो. आपण हे माझ्या मित्रांना आणि टीमला विचारू शकता. मी अनकेदा विराटला म्हणते असते, ‘यु आर सो चिल.’
महत्वाच्या बातम्या
- ‘इंग्लंड अहमदाबादमध्ये हरला नाही तर…’; सेहवागने ट्विट करून केले भारतीय संघांचे अभिनंदन
- ‘रिषभचं वजन कमी केलं आणि…’, शास्त्री यांचा मोठा गौप्यस्फोट
- संशोधनासाठी तरतूदीची रक्कम तीनपटीने वाढली; विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत मंजुरी
- क्रिकेट क्षेत्रातनंतर धोनीची शेतीमध्ये धुव्वादार बॅटींग ; ‘सर्वश्रेष्ठ गोपालक’ पुरस्काराने गौरव
- ‘मॅन ऑफ द मॅच’ ऋषभ पंतने मागितली माफी, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

