अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा किपर आणि बॅट्समन ऋषभ पंतला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. रिषभ पंत याने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण शतक बनवत भारताचा डाव सावरला आहे. वॉशींग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांच्या भागिदारीने भारताने इंग्लंडवर आघाडी मिळवली आहे. रिषभ पंत याने दमदार षटकार ठोकून शतक केलं. यानंतर, उपस्थितांनी त्याला उभं राहून दाद देखील दिली. हे त्याच तिसरं कसोटी शतक ठरलं आहे. ११८ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्यानंतर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रिषभ पंत झेलबाद झाला.
यानंतर, मैदानात खेळताना तुझ्यासाठी कोणती गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची ठरली? असं विचारलं असता, ऋषभने खास उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, ‘मला वाटतं की हार न मानता सतत सराव करणं ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. कारण यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. परिणामी बॅटींगसोबतच विकेटकीपिंगमध्ये देखील सुधारणा झाली.’ त्याच्यासाठी या खेळीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण टीम इंडिया दबावात आली होती. या परिस्थितीतून टीमला बाहेर काढण्यासाठी ही खेळी महत्त्वपूर्ण ठरली.
पंत केवळ फलंदाजीने प्रेक्षकांचं मनोरंजन करीत नाही, तर तो स्टंपच्या मागे उभं राहून अनेक गंमती जमती करत असतो. त्याने केलेल्या टिप्पण्यांनी अनेक चाहत्यांना आकर्षित करतात. हर्ष भोगले यांनी तर असं म्हटलं की, पंतने कॉमेंन्ट्री करण्याच्या बाबतीत माझ्यासारख्या अनुभवी कॉमेन्टेटरलाही मागं टाकलं आहे. याचं उत्तर देताना ऋषभ आपलं हास्य रोखू शकला नाही. तो म्हणाला की ‘ही माझी प्रशंसा आहे, पण माफ करा, ही बाब तुमच्यासाठी एक समस्या बनत आहे.’ तो पुढे म्हणाला की,’ मी स्वतः खूश राहण्यासाठी आणि इतरांना खुशी देण्यासाठी क्रिकेट खेळतो, असा विश्वास बाळगूनच मी लहानाचा मोठा झालो आहे.’
महत्वाच्या बातम्या
- अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड
- नितळ त्वचेसाठी घ्या ‘या’ रसांचा आस्वाद
- धक्कादायक! उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याने शिवसैनिकांनी दैनिकाचे कार्यालय फोडले
- पाय धुण्यासाठी कार्तिक कालव्यात उतरला, दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळला!
- ‘लॉकडाऊन झाल्यास त्यातून उद्योग क्षेत्राला वगळावे’, ‘मसिआ’ची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

