अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा किपर आणि बॅट्समन ऋषभ पंतला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. रिषभ पंत याने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण शतक बनवत भारताचा डाव सावरला आहे. वॉशींग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांच्या भागिदारीने भारताने इंग्लंडवर आघाडी मिळवली आहे.
रिषभ पंत याने दमदार षटकार ठोकून शतक केलं. यानंतर, उपस्थितांनी त्याला उभं राहून दाद देखील दिली. हे त्याच तिसरं कसोटी शतक ठरलं आहे. ११८ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्यानंतर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रिषभ पंत झेलबाद झाला.
भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंड संघाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने धूळ चारली. या मालिकेत अनुभवी खेळाडू जलवा दाखवू शकले नाहीत परंतु युवा खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने मालिकेवर छाप सोडली. यामध्ये भारताचा विकेट कीपर फलंदाज रिषभ पंतचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
रिषभने आपल्या बॅटिंगने स्पर्धेत आपली छाप सोडली तर कीपिंगनेही क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. रिषभच्या या सगळ्या करिश्म्यापाठीमागे त्याने वजन कमी केल्याचा मोठा गौप्यस्फोट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनची चिंता! दोन लाखांची दारू चोरीला
- जनतेने काळजी घेतली तर रुग्ण संख्या कमी होईल – सुनील केंद्रेकर
- या कारणामुळे ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी
- महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयावरून विजया रहाटकर संतापल्या..
- ममता बॅनर्जींना धक्के पे धक्का, आमदार सोनाली गुहा भाजपमध्ये


