अहमदाबाद : येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये लॉर्ड्सवर होणार आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांना उत्तर देताना भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर संपुष्टात आल्याने भारताने १६० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीसमोर अक्षरशः लोटांगण घेतले. इंग्लंडच्या संघाला ५४.५ षटकात १३५ धावांवर सर्वबाद करण्यात भारताला यश आले. इंग्लंडकडून डॅनिएल लॉरेन्सने एकट्यानेच खिंड लढवत सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कर्णधार जो रुटने ३० धावांची खेळी केली.
पहिल्या डावात भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ सुंदरने नाबाद ९६ धावा केल्या. तसेच रोहित शर्माने ४९ आणि अक्षर पटेलने ४३ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने ३ आणि जॅक लीचने २ विकेट्स घेतल्या.
या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा 205 रनवर ऑल आऊट झाला. अक्षर पटेलने 4 विकेट घेतल्या, तर अश्विनला 3, मोहम्मद सिराजला 2 आणि वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट घेण्यात यश आलं.
Congratulations Team India on an awesome Test Series victory.
England didn't lose it in Ahmedabad.
They lost it here .#INDvsENG pic.twitter.com/NXb1AxCHen— Virender Sehwag (@virendersehwag) March 6, 2021
भारतीय संघाच्या विजयानंतरसर्व आजी-माजी क्रिकेटपटू, समीक्षक व चाहते खेळाडूंचे अभिनंदन करत आहेत. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील ट्विट करून विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन केले. सेहवागने हटके ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. सेहवागने ट्विट करताना लिहिले, ‘भारतीय संघाचे या अद्भुत मालिका विजयाबद्दल अभिनंदन. इंग्लंडचा संघ अहमदाबाद येथे नाहीतर, या ठिकाणी हरला.’
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनची चिंता! दोन लाखांची दारू चोरीला
- जनतेने काळजी घेतली तर रुग्ण संख्या कमी होईल – सुनील केंद्रेकर
- या कारणामुळे ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी
- महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयावरून विजया रहाटकर संतापल्या..
- ममता बॅनर्जींना धक्के पे धक्का, आमदार सोनाली गुहा भाजपमध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

