रांची : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर शेती उद्योगात व्यस्त आहे. १५ ऑगस्ट २०२०मध्ये धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. धोनीच्या शेतमालाला रांचीच्या भाजी बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे. मटार आणि टॉम्याटोनंतर धोनीच्या शेतातील ऑरग्यानिक कॉलीफ्लॉवरलाही मोठी मागणी आहे. आणि आता त्याचा शेतातील माल थेट दुबईला पाठवण्यात येणार आहे.
तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. नुकतीच येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली होती. आता ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला रांचीच्या बाजारात मागणी आहे.
आता धोनीने अलीकडेच्या त्याच्या शेतात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. त्याच्या या यशाच्या बातम्या अनेक वृत्तमाध्यमांनी कव्हर केल्या होत्या. यानंतर आता तो ‘सर्वश्रेष्ठ गोपालक’ही बनला आहे. बिरसा अॅग्रीकल्चर यूनिवर्सिटीने (BAU) धोनीला हा मानाचा पुरस्कार देवून त्याचा सन्मान केला आहे.
शुक्रवारी झारखंडचे विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ मेहतो यांनी हा मानाचा पुरस्कार, धोनीचा कर्मचारी कुणाल गौरव यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी बोलताना कुणाल गौरव यांनी सांगितलं की, हा क्षण त्यांच्यासाठी खूप अभिमानाचा आहे. महेंद्र सिंग धोनी त्यांच्या गायी- म्हशींवर खूप प्रेम करतात. ते ज्यावेळी इकडे गावी असतात, तेव्हा किमान एकदा तरी या गायींना भेटायला येतात. त्यांना प्रेमाने चारा खाऊ घालतात, पाणी पाजतात.
महत्वाच्या बातम्या
- अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड
- नितळ त्वचेसाठी घ्या ‘या’ रसांचा आस्वाद
- धक्कादायक! उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याने शिवसैनिकांनी दैनिकाचे कार्यालय फोडले
- पाय धुण्यासाठी कार्तिक कालव्यात उतरला, दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळला!
- ‘लॉकडाऊन झाल्यास त्यातून उद्योग क्षेत्राला वगळावे’, ‘मसिआ’ची मागणी


