🕒 1 min read
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (एनएमसी) वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत सादर करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. सदरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या संदर्भाने मंत्रालयात आढावा बैठक झाली.
उस्मानाबाद येथे केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणे १०० प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे संलग्नीत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे २५ एकर जागा लागणार आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावावर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना देशमुख यांनी बैठकीदरम्यान केल्या आहेत.
हे महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणे गरजेचे आहे असे नमूद करून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर आवश्यक असणारी जमीन ताब्यात घेणे, वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या नावावर करुन घेणे या प्रक्रिया पार पाडणे गरजेचे असल्याचे या वेळी देशमुख म्हणाले. या बैठकीस उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- हटके अंदाजात सेहवागने धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?


