औरंगाबाद : लॉकडाऊन हा शब्द सध्या सर्वसामान्यान लोकांप्रमाणे व्यापाऱ्यांना देखील संभ्रमात टाकत आहे. राज्य शासनाकडून ब्रेक द चेनच्या नावाखाली संभ्रमात टाकणारे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याला व्यापारी संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी दुकाने उघडली. मात्र, पोलिसांनी तत्काळ उघडलेली दुकाने व्यापाऱ्यांना बंद करायला भाग पाडले.
औरंगाबाद मध्ये मार्च महिन्यापासून जिल्हाधिकारी यांनी अंशतः लॉकडाऊन लावले आहे. त्यात अत्यावश्यक सेवांसह आठवड्यातून पाच दिवस सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वच दुकाना उघडण्याचे आदेश धाडले होते. मात्र, राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन संकल्पनेत वीकएन्ड लॉकडाऊन लावले, त्यात काही व्यवसाय वगळता सर्वच दुकाना बंद करण्याचा फतवा काढण्यात आला. त्याला व्यापारी संघटनांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला.
शहरात देखील व्यापारीवर्गाने बैठक आयोजित करून ब्रेक द चेन संकल्पनेला विरोध केला. त्याचा भाग म्हणून व्यापारी सोमवारी आपले दुकाने उघडणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार जुन्या बाजारपेठेतील औरंगपुरा, गुलमंडी, पैठण गेट, शाहगंज या भागातील व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडली. परंतु, पोलिसांनी तत्काळ या भागामध्ये जावून आदेशाप्रमाणे अत्यावश्यक तसेच मुभा असलेली दुकाने वगळता इतर दुकाने बंद केली.
सरकारने संपूर्ण लॉकडाऊन लावल्यास व्यापारी संघटनेचा पाठींबा
सध्या राज्य शासन रोज वेगवेगळे नियम तयार करत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग संभ्रमात आहे. राज्य शासनाने कडक लॉकडाऊन लावावा, यात कोणत्याच गोष्टीची मुभा त्यांनी देऊ नये. मग तो आठ किंवा पंधरा दिवसांचा असला तरी चालेल त्याला आम्ही पाठींबा देऊ असे महाराष्ट्र देशाशी बोलतांना व्यापारी संघटनेचे विजय जैस्वाल यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुला कोण ऐकतं’ असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सला महेश काळेचे सणसणीत उत्तर
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- भाजपच्या माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन, नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाही विचारात घेतले नव्हते – नवाब मलिक
- मोठी बातमी : दहावी बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

