Share

‘तुला कोण ऐकतं’ असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सला महेश काळेचे सणसणीत उत्तर

Published On: 

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलीब्रिटींना आपल्या चाहत्यासोबत संवाद साधायला उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेकदा सेलीब्रिटी हे समाजमाध्यमावर चाहत्यांशी थेट संवाद साधत असतात. मात्र याच सोशल मीडियावर सेलीब्रिटींना ट्रोल करण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. मात्र मागील काही काळापासून सेलीब्रिटीही ट्रोलर्सला जशास तशे उत्तर देऊ लागले आहे.

मराठीतील सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांनाही याचीच प्रचिती आली. मात्र यावेळी महेश काळे यांनी ट्रोल करणाऱ्या चाहत्याला सणसणीत उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली आहे. महेश काळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर त्यांच्या चाहत्याच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला. मात्र एका चाहत्याने महेश काळे यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

हा चाहता महेश काळे यांना म्हणाला की ‘भिमसेन एकच होऊ शकतात, तु तर नाकाने गातोस, एवढा कर्कश कोण ऐकत तुला’ अशी कमेंट केली. या कमेंटला महेश काळेंनी उत्तर देताना म्हणले की, ‘अगदी खरं बोलताय तुम्ही ते एकच होऊ शकतात. मला असाच आवाज दिलाय देवाने काय कराव. पण कळत नाही तरीही का आवडतो माझा आवाज लोकांना.’ असे सणसणीत उत्तर देत महेश काळेनी ‘तुम्ही सुखरुप रहा’ असे म्हणत कमेंट संपवली आणि ट्रोलर्सचे तोंड बंद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!