Share

भाजपच्या माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन, नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Published On: 

पालघर – पालघर जिल्ह्यातील डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन झालं. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर वापीमधील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आलं. मात्र इथे त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान काल भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण वरखंडे तर आज माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन झालं.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे पालघरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि डहाणूचे माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने पक्षाने आदिवासी समाजाचा सेवक गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी अर्पण केली.पाटील म्हणाले की, पास्कल धनारे यांच्या अकस्मिक निधनाने धक्का बसला. त्यांनी दीर्घकाळ पक्ष संघटनेत कार्य केले होते. पालघरचे भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाच्या विस्तारात योगदान दिले होते.

तत्पूर्वी जिल्हा सरचिटणीस तसेच तालुका पातळीवरील पदांवर काम करताना त्यांनी पक्षाचा जनाधार बळकट करण्यासाठी कार्य केले होते. डहाणू या कम्युनिस्टांच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे विजय मिळविला होता. आदिवासींच्या प्रश्नांबाबत त्यांना तळमळ होती. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो असे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!