Share

देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाही विचारात घेतले नव्हते – नवाब मलिक

Published On: 

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ सुरूच आहे. गेल्यावर्षी झालेल्या बिकट परिस्थितीतून कोणताही धडा न घेतल्याने महाराष्ट्रात सध्या आरोग्य आणीबाणी असल्यासारखे चित्र आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड मिळत नाहीयेत,इंजक्शनचा देखील तुटवडा आहे, ऑक्सिजन देखील काही ठिकाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. यातच कोणतीही ठोस उपाययोजना न करता आता सरळ लॉकडाऊन करण्याची तयारी राज्यसरकारने सुरु केली आहे.

या पार्श्वभूमीवर सवर्सामान्य नागरिक ते व्यावसायिक देखील या निर्णयाच्या विरोधात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांना राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी विरोधीपक्ष करत असताना सत्ताधारी मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सुरु असणारे गलिच्छ राजकारण जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

दरम्यान, आज पुन्हा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका करण्याचा धडाका सुरूच ठेवला असून आजी राष्ट्रवादीने विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. देशात लॉकडाऊन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नाही टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपचे नेते लॉकडाऊनमधील वेगवेगळ्या पॅकेजबाबत बोलत असून त्यांच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल परंतु जे काही भाजपचे लोक पैसे द्या पैसे टाका सांगत आहेत ते योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्चितपणे सरकार करेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!