मुंबई : राज्यासह देशात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी गेले अनेक दिवसांपासून करत होते.
याच पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक आज घेण्यात आली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. या बैठकी दरम्यान मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी व बारावीच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिकृत माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
???? Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha #HSC #SSC #exams (1/5) pic.twitter.com/cjeRZAT7ux
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2021
बारावीची परीक्षा मे महिनाच्या अखेरीस तर दहावीच्या विद्यार्थ्यांची जून महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाही विचारात घेतले नव्हते – नवाब मलिक
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- अनिल देशमुख यांची याच आठवड्यात सीबीआय करणार चौकशी ?
- …तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार
- नेहा कक्करच्या गाण्यावर अन्नु मलिक म्हणतोय ‘मला स्वतःच्या कानाखाली मारावसं वाटतंय’


