पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांना बंदीचे आदेश दिले आहेत. पुण्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असून संध्याकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, पुण्यातील व्यापाऱ्यांचे या निर्बंधांमुळे मोठे नुकसान होत असून सरकारच्या नियमांविरोधात जाऊन दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता.
या पार्श्वभूमीवर काही निवडणूक व्यापारी संघटेनच्या सभासदांना काल पुण्याचे विभागीय आयक्त सौरभ राव यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मांडून गेले आठवडाभर दुकाने बंद असून देखील रुग्णसंख्येवर परिणाम झालेला नाही. रुग्णसंख्येचा आलेख हा वाढतच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होण्यापेक्षा योग्य खबरदारी बाळगून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच, ई-कॉमर्स(फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, आदी) व्यवसाय सुरु आहेत. त्यांच्या डिलिव्हरी देखील सुरु आहे यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. जर बंद करायचेच असेल तर सरसकट बंदी घालून लॉकडाऊन करावा, अन्यथा आक्रोश होऊन दुकाने उघडावी लागतील, असा इशारा येवले व्यापाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, सौरभ राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहावी. यानंतरच, आपले पाऊल उचलावे अशी विनंती केली आहे. त्यामुळे सोमवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून सविनय कायदेभंग करण्याचे ठरवलेले आंदोलन देखील संयम बाळगून पुढे ढलकलण्यात आल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाभारत मध्ये ‘देवराज इंद्र’ची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- सरकार कुठपर्यंत पोहोचणार, त्यांना दोष देऊन उपयोग नाही : नाना पाटेकर
- देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाही विचारात घेतले नव्हते – नवाब मलिक
- मोठी बातमी : दहावी बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

