🕒 1 min read
मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे ‘झी रिश्ते अवॉर्ड्स २०२०’च्या तयारी बिझी आहे. अंकिताने सोशल मीडियावर रिहर्सलचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अंकिता लोखंडे एका डान्सच्या माध्यमातून सुशांतला ट्रिब्यूट देणार आहे. याच रिहर्सल दरम्यान अंकिता सुशांतची ऑनस्क्रीन आई उषा नाडकर्णी यांना भेटायला पोहोचली होती. यावेळी दोघीही सुशांतची आठवण काढून इमोशनल झाल्याचे दिसले. या भेटीचा व्हिडीओ अंकिताने शेअर केलाय.
‘पवित्र रिश्ता’ मालिका संपल्यावर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांच्यात तशी फारच कमी भेटी झाल्या. अंकिता आणि उषा अनेक वर्षांनी एकमेकींना भेटल्या. अंकिताने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘आईला बऱ्याच वर्षांनी भेटले. त्या दिवसेंदिवस तरूण होताहेत. एकदम कडक आई…’
आपल्या ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णी यांच्या गोष्टी ऐकून अंकिता लोखंडेचं मनही हलकं झालं. अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी काही तास एकमेकींसोबत गप्पा करत होत्या. अंकितासोबत जुन्या आठवणी ताज्या करता करता उषा नाडकर्णी यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं.
https://www.instagram.com/p/CIYZFFnBBd-/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- ‘काळे फासण्याच्या धमक्यांना भीत नाही,म्हणूनच तारीख आणि वेळ जाहीर करुन मी शिर्डीत येतेय’
- विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे : अशोक चव्हाण
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- कृषी कायद्यांविरोधात काही लोक राजकीय हेतूनं गैरसमज पसरवत आहेत : खोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
