🕒 1 min read
पुणे : शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे.
संस्थानाच्या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली होती. ‘पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?’ असा सवाल करत त्यांनी शिर्डी संस्थानने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन जो बोर्ड लावला आहे तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असा इशारा त्यांनी दिला होता.दरम्यान, श्रध्दा आणि सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे म्हणूनच पुन्हा एकदा संस्थानला तृप्ती देसाई यांनी विनंती केली आहे की “आपण सदर बोर्ड तातडीने काढून टाकावा अन्यथा 10 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आम्हाला शिर्डीत येऊन तो बोर्ड काढावा लागेल.”
दरम्यान, आता हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तृप्ती देसाई यांनी साई मंदिरातील ड्रेसकोडप्रकरणी शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व ‘शिवसेना स्टाइल’ने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी हा इशारा दिला आहे.
शिवसेनच्या या भूमिकेनंतर देसाई या अधिकच आक्रमक झाल्या आहेत.’महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणतात,10 डिसेंबर रोजी ह्यूमन राइट्स डे आहे.आणि संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार शिर्डी संस्थान पोषाखा संदर्भात केलेल्या बोर्डाच्या माध्यमातून भक्तांकडून हिरावून घेत आहे, अशी मनमानी आम्ही चालू देणार नाही. म्हणूनच आम्ही आठ दिवस आधी शिर्डी संस्थानाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ मार्गाने हात जोडून विनंती केली आहे की अशा पद्धतीचा बेकायदेशीर बोर्ड आपण काढून टाकावा आणि वाद वाढवू नये. परंतु जर शिर्डी संस्थांनने हा बोर्ड काढला नाही तर मात्र आम्हाला 10 डिसेंबर रोजी शिर्डीत जाऊन हा बोर्ड काढावाच लागणार आहे.
देसाई म्हणाल्या, आम्ही अशी भूमिका घेतल्यावर काही जणांनी आम्हाला अडवण्याची, काळे फासण्याची भाषा केली आहे. त्यांना मला हेच सांगायचे आहे की शिर्डी साई बाबांचे मंदिर हे अध्यात्मिक स्थान आहे आणि काळं भासायची भाषा करणारे साईबाबांचे भक्त असूच शकत नाहीत. आणि ज्यांना मला काळे फासायचे असेल त्यांनी आवर्जून यावे, अशा धमक्यांना मी भीत नाही. म्हणूनच आम्ही तारीख आणि वेळ जाहीर करुन येत आहोत.कारण आम्हाला जसा आंदोलन करण्याचा अधिकार आहे तसा लोकशाहीमध्ये त्यांना आम्हाला विरोध करायचा अधिकार आहे.आमचा विरोध भक्तांचे अधिकार हिरावून घेतला जात आहे त्याच्या विरोधात आहे ,ही कोणतीही स्टंटबाजी नाही असं ठामपणे देसाई यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ ; पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले
- विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे : अशोक चव्हाण
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

