नाशिक : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या ९ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरत आहेत. कृषी कायद्याच्या समर्थनात ६ डिसेंबरला शेतकरी एल्गार होणार असल्याची घोषणा खोत यांनी केली आहे.
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यां विरोधात काही लोक राजकीय हेतूनं गैरसमज पसरवत आहेत. दिल्लीतलं शेतकरी आंदोलनही अशाच प्रकारे राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याचा आरोप राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला.
या तीनही कायद्यांचं समर्थन करण्यासाठी ६ डिसेंबरला रयत क्रांती संघटना आझाद मैदानावर निदर्शनंही करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारने मंजूर केलेली तीनही कृषी कायदे शेतकरी हिताची आहेत. या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमी भाव खरेदी केंद्र यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, उलट शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारा बाहेरही त्यांचा कृषी माल विकण्याचे विविध पर्याय निर्माण होतील असं खोत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, शरद जोशी यांना अभिप्रेत असलेलं हे कृषी बिल असल्याचं सांगत मार्केट कमिटी आणि दलालांसाठी बांडगुळ म्हणून काम करणारे मूठभर लोक या कायद्याला विरोध करत असल्याचं म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारली दिली जाऊ नये हा काही राजकारण्यांचा स्वार्थ आहे, असे खोत यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- ‘काळे फासण्याच्या धमक्यांना भीत नाही,म्हणूनच तारीख आणि वेळ जाहीर करुन मी शिर्डीत येतेय’
- विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे : अशोक चव्हाण
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
