Share

‘सीआयडी’ मालिकेतील कलाकाराचे लग्नाच्या १७ वर्षांनंतर थांबले वैवाहिक आयुष्य

Published On: 

मुंबई : सोनी टीव्हीवरील  ‘सीआयडी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता हृषीकेश पांडेचा घटस्फोट झाला असल्याचे त्याने एक मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. घटस्फोटाचा परिणाम  लहान मुलांवर होतो. यासाठीच हृषीकेशने गेली अनेक वर्षे यावर कधीही वक्तव्य केलं नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावर वक्तव्य केलं आहे.

२००४ मध्ये हृषीकेशने त्रिशा दुभाष हिच्याशी विवाह केला होता, पण काही वर्षातच त्यांच्यात वाद सुरु झाले. २०१४ मध्ये दोघे वेगवेगळे राहू लागले आणि त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. काही कारणांमुळे ही प्रकिया लांबली आणि तब्बल सात वर्षांनी म्हणजेच यंदाच्या वर्षी १७ वर्षांचं त्यांच वैवाहिक आयुष्य आता कायदेशीर पणे घटस्फोट झाला.

https://www.instagram.com/p/CNUQI58Bn5t/?utm_source=ig_embed&ig_rid=2d350f2e-e84f-4e5a-b0ac-c92dd112cdeb

हृषीकेश आणि त्रिशा यांना दक्ष नावाचा एक मुलगा आहे. दक्ष हा आता १२ वर्षांचा आहे. या दोघांनी स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली, तेव्हा तो पाच वर्षांचा होता. घटस्फोटाच्या बातम्या आणि होणाऱ्या चर्चांमुळे त्याच्या मनावर परिणाम होऊ नये. सोबतच खासगी आयुष्याची चर्चा होऊ नये म्हणून इतकी वर्ष यावर चर्चा केली नाही. मात्र, आता दक्ष मोठा झाला असून आता त्याला गोष्टी कळतात. तर, आता कायदेशीरपपणे घटस्फोट झाल्याने समोर येऊन बोलत असल्याचे हृषीकेशने सांगितले. त्रिशा आणि हृषीकेशने या सगळ्या गोष्टी शांतते हाताळल्या. दक्षची कस्टडी ही हृषीकेशला मिळाली आहे. हृषीकेशनं त्याच्या मुलाल आईला भेटण्यापासून कधीही थांबवले नाही.

याविषयी बोलताना तो म्हणाला की, ‘वेगळं राहण्याच्या काळात सगळं चांगलं असल्याचं दाखवत जगत राहणं खूप कठीण होतं. मी दिवस-दिवस शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे दक्षला हॉस्टेलवर ठेवलं होतं. त्यावेळी त्याच्या शाळेतील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी काम संपवून रात्रभर ड्रायव्हिंग करून मी त्याच्या शाळेत जात होतो, पण आता दक्ष थोडा मोठा झाल्यानं माझ्या कामाचं स्वरूप त्याला समजू शकतं. घटस्फोट होऊनही माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही.आता लगेच मी कोणत्याही नव्या नात्यासाठी तयार नाही, आहे त्या आयुष्यात खुश असल्याच त्याने सांगितले. हृषीकेशने  ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘जग जननी मां वैष्णोदेवी’ अशा अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!