Share

‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत

Published On: 

बीड: लस जास्त प्रमणात उपलब्ध झाल्यास राज्यातही लवकरात लवकर सर्व घटकांना लसीकरण होईल आणि लसीकरण पूर्ण झाल्यास कोरोनाची तिसरी लाट सुद्धा आपण निश्चितपणे रोखू शकतो, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिरूर कासार येथील एका कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना व्यक्त केले. शिरूर कासार येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे मानवलोक संस्था व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुरू केलेल्या पद्मविभूषण शरदचंद्र पवार कोरोना केअर सेंटरचे ऑनलाइन उदघाट्न करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, अगोदर महाराष्ट्रावर टीका होत होती. मात्र, आम्ही कोरोनाची लाट ज्या प्रकारे रोखली ते पाहून आता आमची स्तुती होत आहे. तुमच्या यशाचे गुपित आम्हाला सांगा असे आता बाकीची राज्ये म्हणू लागली आहेत. यात सर्वात मोठा वाटा आमच्या प्रशासनातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व अधिकाऱ्यांचा असल्याचे सुळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अकराच्या अकरा तालुक्यात प्रत्येकी ५० ऑक्सिजन बेडचे हॉसस्पिटल चालू करणार असून तिथे सर्व सुविधा मोफत देणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी सांगितले. आम्हाला बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत रेमडेसिविर लसी व कोव्हॅक्सिन, कोविशील्ड लसी जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्फत केंद्राकडे मागणी केली. आम्ही माणसाची यंत्रणा तत्काळ उभी करू. मात्र, प्रशासनाकडून व तुमच्याकडून लगेच मंजुरी द्या, अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!