Share

आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे

Published On: 

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या  पत्नी करुणा धनंजय मुंडे या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. करुणा या लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या एका फेसबुक व्हिडीओमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

आमदार निवासासाठी कोट्यावधी पैसा खर्च करण्याची गरज नाही अशी विनंती करुणा मुंडे यांनी केली आहे. ‘मी एक आमदाराची पत्नी आहे. धनंजय मुंडे माझे पती हे मंत्री आहेत. ते जेव्हा विधानपरिषदेवर आमदार होते तेव्हापासून त्यांचे परळीमध्ये तीन बंगले आहेत. एक फार्म हाऊस आहे, पुण्यात दोन बंगले आणि मुंबई दोन फ्लॅटही आहेत. इतकंच काय तर आम्हाला सरकारी बंगलाही मिळाला आहे. इतर आमदार देखील चांगलेच श्रीमंत असून आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याची गरज नाही. त्यातून सामान्यांना मदत करा’ अशी विनंती करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, मी सरकारला विनंती करते की, पोलिसांच्या वस्त्या नवीन बनवा, दुरुस्त करा. जी इमारत आमदार निवासासाठी उभारली जात आहे त्यावर एवढे पैसे खर्च करण्याची गरज काय गरज आहे? हा पैसा सामान्यांसाठी वापरा असे आवाहन त्यांनी केले आहे. आमदार असताना जिथे जिथे जातात तिथे जर बंगले उभे करत असतील तर त्यांच्यासाठी मनोरा बांधण्याची काय गरज असा थेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.मुंबईत काही ठिकाणी बोटीतून पाणी आणावे लागतेय. झोपडपट्टी भागात असुविधा आहेत. आमदार निवासावरील पैसा त्यावर खर्च करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!