🕒 1 min read
उस्मानाबाद: जिल्हातील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेऊन मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई महाविकास आघाडी सरकारने योग्य पद्धतीने हाताळली नाही, आता हे आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून आंदोलनात्मक पावले उचलली जातील, असेही मत त्यांन यावेळी व्यक्त केले.
आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळवून देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले होते. योग्य ती घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण दिल्यामुळे उच्च न्यायालयात व तद्नंतर सर्वोच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल होऊन देखील आरक्षण कायम राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षम हाताळणीमुळे आता आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला नव्याने आंदोलनाची वेळ आली.
या समाजाच्या नावाने व नेतृत्वात आंदोलने होतील, त्यामध्ये भाजपा पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनामध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असे आ. पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून, त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे, असा आरोपही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
- वीरु धावला कोरोनापीडीतांसाठी, सुरु केली ‘राहत की सास’; गरजुंना मिळणार मोफत ऑक्सिजन
- सासूचा खून करून फरार असलेला जावई अखेर पोलिसांच्या ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
