🕒 1 min read
दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा नव्याने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांना या विषाणुची लागण झाली. तसेच कोरोनाच्या या काळात देशभरात ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. असाच अनुभव भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागला आला.
काही दिवसापुर्वी सेहवागला त्याच्या एका मित्राचा फोन आला. त्याच्या मित्राची तब्येत खुपच गंभीर होती. त्याला तत्काळ ऑक्सिजनची गरज होती. त्यावेळी सेहवागला मोठ्या प्रयत्नानंतर एक ऑक्सिजन कॉंसंनटेटर मिळाले आणि सेहवागच्या मित्राचा जीव वाचला. मात्र या घटनेमुळे वीरुला ऑक्सिजनचे महत्व कळाले, यामुळे त्याच्या मित्राला झालेला त्रास इतरांना होऊ नये यासाठी सेहवागने एक मोफत ऑक्सिजन बॅक सुरु केली ज्याला गरज असेल त्याने मोफत घेऊन जावे आणि काम झाल्यानंतर ते परत करण्याची विनंती सेहवागने केली. यावेळी त्याने एक फोन नंबर देखील शेअर केला आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/1394891359081750542
एकीकडे देशभरात ऑक्सिजनचा काळाबाजार सुरु असताना विरेंद्र सेहवागने सुरु केलेल्या मोफत ऑक्सिजन बॅकेमुळे अनेक गरजुंचा जीव वाचवला जाईल. सेहवागने ट्विट करुन या उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच यावेळी त्याने मित्राला मदत केल्यानंतर ऑक्सिजनचे महत्व सांगितले. त्यामुळे पैसे असो वा नसो ऑक्सिजनमुळे कुणालाही जीव गमवावा लागु नये यासाठी हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे सेहवागने सांगितले. तसेच यावेळी ५०,००० रुपयांच्या ऑक्सिजन कॉंसंनटेटर गरजुना २-३ लाख रुपयांना विकले. सेहवागच्या या उपक्रमाचा सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात कोरोनाच्या भीतीने लसीकरणाला गर्दी; सोशल डिस्टन्सिंग मात्र पायदळी
- आमच्या कोकणातही प्रचंड नुकसान झाले आहे मग मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर का येत नाहीत?
- अमृता फडणवीस आणि चाकणकरांमध्ये ट्विटवॉर, ‘शेरनी’चे शेर एकमेकींकडून शेअर
- जालन्यातील ‘हे’ गाव ठरतंय कोरोनाचे हॉटस्पॉट!
- विनाकारण फिरणाऱ्याला होणार 500 रूपये दंड, वापरलेले वाहनही पोलीस घेणार ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
