Share

बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असल्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाहीये तसेच आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास ई-पास असणे गरजेचे आहे. खरं कारण सांगून तर ई-पास मिळणार नाही म्हणून अनेक लोकं बोगस ई-पास बनवून घेण्याच्या भानगडीत पडले आणि अशा वेळेस जन्म होतो गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांचा. बनावट ई-पास बनवून देण्याचे प्रकार अशामुळे सुरु झाले.

उस्मानाबादसह कळंब येथील पोलिसांच्या वतीने संयुक्त कारवाईत प्रवासाचे बोगस ई-पास बनवणाऱ्या तिघांना पोलिस अधीक्षक कार्यालयातील आयटी सेल (उस्मानाबाद) व कळंब पोलीसांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले. ही साखळी जिल्हाभर बोगस ई-पास बनवून देत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून प्रवासाचे बोगस ई-पास तयार करुन नागरिकांची फसवणूक होत असल्याची चर्चा सुरू होती. १७ मे रोजी गोपनीय माहितीच्या आधारे कळंब येथे बनावट ई-पास तयार करून देत असल्याची माहिती आयटी सेल यांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक कार्यालयातील आयटी सेलमार्फत याची शहानिशा करण्यात आली.

कळंब येथील श्रीकांत शिवाजी कवडे (रा. कन्हेरवाडी) हा त्याच्या मोबाईल वरून बनावट ई-पास बनविण्यासाठी ग्राहकांचे आधार कार्ड, फोटो व इतर माहिती तसेच १२०० रुपये प्रतिपास, असे घेऊन तो उस्मानाबाद येथे असलेल्या महादेव दत्तू राजगुरू यास देत होता. महादेव राजगुरू हा त्याच्याकडे प्राप्त कागदपत्रे विजय भागवत शिरसाट (रा. सांजा रोड उस्मानाबाद) त्याच्याकडे ई-पास बनविण्यासाठी देत होता. विजय शिरसाट हा त्याच्या संगणकावर बनावटीकरण करून बनावट ई-पास तयार करून ग्राहकांना देत असल्याचे उघड झाले. आयटी सेलचे अमोल गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरील तिघांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपींना कळंब न्यायालयासमोर हजर केले असता २१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!