बीड : बीड शहरातील आयटीआय कोविड सेंटर घाणीच्या विळख्यात सापडले आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे आरोग्य अधिक धोक्यात सापडले आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीच या समस्यांवर इलाज करावा अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील आयटीआय कोविड सेंटर मधिल रुग्णांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बुधवारी सकाळी नाष्टा मिळालाच नाही. सकाळचे जेवण दुपारी ३ वाजता मिळाले. जेवणाचे डबे पुरवणाऱ्या मुलांना विचारणा केली असता आम्ही दोघेच सर्व ठिकाणी डबे पोहोचवण्याचे काम करतो म्हणुन उशीर लागतो असे सांगितले. बहुतेक जणांना घरूनच जेवणाचे डबे येतात. मग कंत्राटदार सरसकट जेवाणाचे पैसे घेऊन शासनाची फसवणूक करतात.
अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही, गिझर बिघडल्याचे कारण सांगितले जाते. कोविड सेंटर मध्ये एकच ऑक्सिमीटर आहे. बहुतांश रुग्णांना बेडशीट नाहीत. नविन रुग्ण आला तर त्यांना जुनेच न धुतलेले बेडशीट दिले जाते. पिण्याच्या पाण्याची कमतरता असून एकच जार पाणी दिले जाते. रुग्णांनी खोकल्यासाठी औषधे मागितली तरी दिली जात नाहीत असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्योग क्षेत्राने कामगार कपात टाळावी, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
- लॉकडाऊनचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम, उद्योग संस्थांची भीती
- हद्दच झाली! रेमडेसिवीरच्या उपलब्धतेवरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद
- लेटरवॉर! धनंजय मुंडेंनी आव्हान दिले पंतप्रधानांना लिहा पत्र, पंकजांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना
- ‘भाऊ, ‘तो’ हक्क फक्त तुम्हालाच आहे!’, पंकजांचा धनंजय मुंडेंवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

