Share

लेटरवॉर! धनंजय मुंडेंनी आव्हान दिले पंतप्रधानांना लिहा पत्र, पंकजांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना

Published On: 

बीड : पंकजा मुंडे यांनी राजेश टोपे यांना पत्र लिहून लसीकरण सुरळीत पार पाडण्याची व रेमेडिसिवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावरून धनंजय यांनी पंकजावर हल्लाबोल केला. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधान मोदी पाठवावे असे आव्हान धनंजय मुंडे यांनी केले होते. पण त्यापूर्वीच पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. मात्र, त्याचा विषय वेगळा आहे.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणच्या नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, हा उपसा तत्काळ थांबवून वाळू माफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. जिल्ह्यात ‘दहशत जनतेला आणि संरक्षण मात्र चोरांना’ अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली आहे.

परळी तालुक्यातील पोहनेर येथील गोदावरी नदीपात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसूल करावा, या मागणीसाठी पोहनेरसह डिग्रस, तेलसमुख, बोरखेड या गावांतील ग्रामस्थ परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. ग्रामस्थांनी पोहनेर येथील वाळू उपशाचा प्रकार पंकजा मुंडे यांना सांगताच त्यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

उपसा केलेल्या वाळूचे तत्काळ पंचनामे करावेत, बाहेरील जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची टीम नियुक्त करून अवैध वाळू साठ्यांवर छापे मारून त्याचे ऑडिट करावे तसेच वाळू माफियाला सहकार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि सध्या सुरू असलेला अवैध वाळू उपसा तातडीने थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणेला लगेचच सूचना द्याव्यात, अशी मागणी पंकजांनी पत्रात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!