बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय या बहिण भावातील वाद सर्वश्रूत आहे. प्रश्न बीड जिल्ह्याचा असो वा देशातील. एकाने त्या मुद्द्यावर भाष्य केले की दूसरा त्यावर निश्चितपणे बोलणार, टीका करणार. पण कोरोनाच्या मुद्दाही त्याला अपवाद राहिला नाही हे समोर आलेय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कोरोना लसीवरुन शाब्दिक युद्ध सुरू झालेय.
पंकजा मुंडे यांनी राजेश टोपे यांना पत्र लिहून लसीकरण सुरळीत पार पाडण्याची व रेमेडिसिवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावरून धनंजय यांनी पंकजावर हल्लाबोल केला. ‘अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि प्रितमा मुंडेंच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले.
तसेच, ”ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल” असे खोचक आवाहन केले होते.
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! @Pankajamunde @DrPritamMunde
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
यानंतर धनंजय यांच्या या प्रत्युतराला पंकजा यांनी चांगलेच झोडले आहे. ‘राज्याच्या भल्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनाही पत्र लिहीन. त्याची दखल देखील घेतली जाईल. तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा. हक्क तुम्हाला आहेच भाऊ!’ असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंना फटकारले आहे.
राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ! pic.twitter.com/H6dgMPaFFL
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2021
लसीकरणावरून दोन्ही भावा-बहिणीतील वाद काही थांबायचे नाव घेत नाहीये. लसीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा विषय आता आरोप-प्रत्यारोपांवर पोहोचला आहे. पंकजांनी तर थेट तुम्ही बीड जिल्ह्यात माफिया आणले असा आरोप केला आहे. आता याला धनंजय मुंडे पुन्हा काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
- २४ तासांत माज उतरला! पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या जतीनने मागितली जाहीर माफी
- पत्नी सोबत वेळ घालवता यावा म्हणून अनुपम खेर यांनी अमेरिकन सीरिजला ठोकला रामराम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- ‘भाजपकडे 105 तर महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत; मग सत्तापरिवर्तन कसे होणार?’

