Share

हद्दच झाली! रेमडेसिवीरच्या उपलब्धतेवरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद

Published On: 

उस्मानाबाद : कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन सध्या वरदान ठरत आहे. त्यामुळे याचा तुटवडा जाणवत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने राज्य सरकारकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनधींनी याबाबत माहिती दिली. लवकरच आता रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्यासाठी मिळणार आहेत.

पण याकरिता शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जालना येथून ५०० रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले. तर शिवसेना आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही सेना नेत्यांच्या मागणीनंतर इंजेक्शन मिळत असल्याचा दावा केला आहे.

भाजप आ.राणा पाटील म्हटले आहे की, शासकीय आरोग्य यंत्रणेकडे असलेला साठा संपला होता व मागणी करूनही रेमडेसिवीर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात १० हजार रेमडेसिवीरच्या व्हायल्स उपलब्ध करून दिल्याचे ट्विटरद्वारे जाहीर केले होते. त्यामुळे कालपासून राजेश टोपे व डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे उस्मानाबादला रेमडेसिवीर देण्याबाबत मागणी केली होती. खासगी दवाखान्यांच्या गरजेचा विचार करता एफडीएकडे पाठपुरावा सुरू असून, जिल्हा प्रशासनाने १२ हजार व्हायल्सचा नवीन मागणी आदेश दिला आहे. त्याचा पुरवठा २ दिवसात सुरू होणे अपेक्षित आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत देखील अधिकचा साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

दुसरीकडे शिवसेना आमदार कैलास पाटील म्हणतात की, इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन काही दिवासापासून त्यासंदर्भात सबंधित खात्याच्या मंत्र्यासमवेत चर्चा करुन हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, जिल्ह्यासाठी दहा हजार वायल्स उपलब्ध करुन देण्याचा शब्द राज्य शासनाच्या वतीने दिला आहे. सध्या राज्यामध्येच मोठ्या प्रमाणात रेमडेसीवीर तुटवडा जाणवत असल्याने त्याच प्रमाणे जिल्ह्यात देखील तशीच स्थिती आहे. पण राज्यसरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!