Share

उद्योग क्षेत्राने कामगार कपात टाळावी, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

Published On: 

मुंबई : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात लॉकडाऊन सुरू झाला आहे. राज्यात खाटांची संख्या कमी पडत आहे. ऑक्सिजनची गरज वाढली आहे. परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग विश्वाने या लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करावे. राज्य शासन दुहेरी संकटात आहे. या संकट काळात उद्योगांना झळ बसणार आहे. त्यांनी ती सहन करण्याची तयारी दाखवावी. कामगारांच्या हिताचे रक्षण करावे व कामगार कपात टाळावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

वसई-विरार परिसरातील तीन औद्योगिक संघटनांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, वसई पट्ट्यातील उद्योजक निर्यातीत आघाडीवर आहेत. शासनाने निर्यातप्रधान उद्योग सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. अत्यावश्यक सेवा, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, निरंतर प्रक्रिया करणारे उद्योग हे उत्पादन सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा.

उद्योगांमध्ये २० ते ४० वयोगटातील कामगार मोठ्या संख्येने काम करतात. लसीकरणासाठी ४५ वर्षे वयाची अट आहे. ती अट शिथिल करून या २० ते ४० वयोगटातील कामगारांचा लसीकरणासाठी समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन सुरू केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात नक्कीच यश मिळणार आहे. पण त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल, अशी भीती भारतीय उद्योगांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!