🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचाच बोलबाला आहे. क्रुझ पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने कारवाई करत अटक केल्यापासून नवाब मलिकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर आर्यनला जामीन मिळाला आणि मलिकांनी या ड्रग्ज प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यावरुन आता भाजप चांगलीच आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे.
बाळासाहेब असो किंवा उद्धव ठाकरे, किंवा मग शरद पवार आमच्या नेत्यांनी आम्हाला राजकारणाची पातळी ओलांडायची नाही, हे शिकवलं आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे.
माणूस एकदम भला आहे, प्रॉब्लेम एकच… कधीच खरं बोलत नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. दरम्यान, संजय राऊत, नवाब मलिक, देवेंद्र फडणवीस, ड्रग्ज या सर्व प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळात आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात.
माणूस एकदम भला आहे, प्रॉब्लेम एकच… कधीच खरं बोलत नाही! pic.twitter.com/gN9s7yKEOL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2021
महत्वाच्या बातम्या
- मी दाखवतो कोण पार्ट्या करतात; नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा
- ‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात
- ‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’
- दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान; मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप
- शिवसेनेच्या वाघिणीने मैदान मारलं, मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
