🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले होते पण त्यात ‘हिरोईन’चा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता. त्यावरून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
एनसीबीने फक्त हेरॉईन नव्हे तर नेत्यांच्या-अभिनेत्यांच्या बिघडलेल्या हिरोंना पण पकडलंय. त्यांची पाठराखण करण्याच्या नादात महाविकास आघाडी सरकार व्हिलन बनले आहे, अशी टीका वाघ म्हणाल्या यांनी यावेळी केली आहे.
#NCB नं फक्त हेरॅाईन नव्हे तर
नेत्यांच्या – अभिनेत्यांच्या बिघडलेल्या#Hero ना पण पकडलंय..आणि त्यांची पाठराखण करण्याच्या नादात#MVA सरकार #विलन बनलंय.. pic.twitter.com/hywjpLDnFt
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 24, 2021
सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे.’ तसेच, केंद्रातील तपास युनिटच या प्रकरणांचा तपास लावू शकतात, असे नाही. तर, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले होते पण त्यात ‘हिरोईन’चा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिक मुस्लीम आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते- संजय राऊत
- गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; एसआयटी मार्फत चौकशीची मलिकांची मागणी
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- ‘गांजा फुंकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असलेले ‘हे’…’; सदाभाऊ खोतांचा परीक्षा गोंधळावर संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
