नाशिक : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील पंच किरण गोसावीच्या बॉडीगार्डचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये एनसीबीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये बोलताना राऊतांनी विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत.
एनसीबी नावाचा प्रकार महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कामाला लागलाय. इथं घराघरात गांजा पिकविला जातो अशारितीने महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे, असे संजय राऊत म्हणाले. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून पुराव्यासह एनसीबीवर आरोप करत आहेत. मात्र, ते फक्त मुस्लीम समाजाचे असल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. ते पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांच्या पाठिशी संपूर्ण मंत्रिमंडळाने ठामपणे उभे राहायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात फिल्म इंडस्ट्री आहे. हे फिल्म इंडस्ट्री दुसऱ्या राज्यात हलविण्यासाठी बॉलीवूडमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय. एनसीबीने एका सुपरस्टारच्या मुलाला अटक केली. त्यांच्या माहितीनुसार त्यांनी कारवाई केली असेल. पण, हे फक्त याच प्रकरणात नाही. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात देखील महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर कोणी संशय व्यक्त केला, तर त्यांना देशद्रोही ठरविलं जातं, असेही संजय राऊत म्हणाले.
अंमली पदार्थाच्या संदर्भात महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. दोन व्हिडिओ समोर आले आहेत. या सर्व प्रकरणाची कठोर चौकशी करावी. न्यायालयीन चौकशी करावी. कोणाच्या दबावाखाली केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई आणि महाराष्ट्रात कारवाई करतात हे समोर आले आहे. एनसीबी मुखवटा सर्वांसमोर यायला हवा, असेही ते म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काय समजतात. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. याच यंत्रणांकडून खंडणी उकळण्याचा प्रकरण समोर आला आहे. ते कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे. इतकं सर्व झाल्यानंतरही तुम्ही या अधिकाऱ्यांच्या बाजून उभे राहता आणि राज्याची बदनामी करतात, अशी टीका राऊत यांनी विरोधकांवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; एसआयटी मार्फत चौकशीची मलिकांची मागणी
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- ‘गांजा फुंकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असलेले ‘हे’…’; सदाभाऊ खोतांचा परीक्षा गोंधळावर संताप
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले शरद पवार, परंतु…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
