🕒 1 min read
हरियाणा : संपूर्ण देशात सद्या कृषी कायद्यांना विरोध वाढत आहे. या कायद्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला असून या बंदला अनेक जिल्ह्यांसह शहरात देखील पाठींबा मिळत आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या आजच्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
पंजाब-हरियाणा-दिल्लीमध्ये चिघळलं असून लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी सामन्यांना त्रास होऊ न देता हे आंदोलन करायचं ठरवलं होतं. हरियाणा राज्यातील अंबाला-हिसार महामार्गावर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर, मोठ्या प्रमाणात जमाव देखील रस्त्यावर उतरला होता.
या आंदोलनावेळी एक रुग्णवाहिका अडकली होती. मात्र, ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच जमाव बाजूला झाला व रुग्णवाहिकेला मार्ग करून देत पालनहार असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मोठेपणाचं दर्शन घडवून दिलं. ANI ने संबंधित व्हिडीओ संदर्भात माहिती दिली आहे.
#WATCH | Haryana: People protesting agianst farm laws make way for an ambulance to pass through a section of the Ambala-Hisar highway#BharatBandh pic.twitter.com/CRBXc0JU2P
— ANI (@ANI) December 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- दुकान जबरदस्तीने बंद करायला आलेल्या कार्यकर्त्यांना रणरागिणीने चांगलंच झापलं; व्हिडीओ होतोय व्हायरल!
- ‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- व्यापाऱ्यांवर वेळ येईल तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवू- अंकुश काकडे
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- भारतीय वंशाच्या ‘या’ नशीबवान व्यक्तीला सर्वात प्रथम मिळणार कोरोनाची लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
