मुंबई : भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषदेत केली. केंद्रसरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागच्या ११ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. तसेच सामान्य लोकांनी या बंदला उस्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा देताच भाजपने खासदार शरद पवार साहेब हे कृषीमंत्री असतानाचे एक पत्र व्हायरल केले आहे. खरंतर पवारसाहेबांनी तेव्हा सर्वसमावेशक आणि व्यापक अशा ‘Model APMC Act’ साठी राज्यांना सूट दिली होती. मात्र मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामध्ये राज्यांना आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कोणताही निर्णय एकट्याने घेतला नव्हता. निर्णय घेत असताना त्यांनी राज्याचे म्हणणे ऐकून घेतले तसेच केंद्राचा कायदा सरसकट न लादता राज्यांनाही त्यांच्यापद्धतीने बदल करण्याचे अधिकार दिले. मोदी सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना निष्प्रभ केले आहे. तसेच हमीभावाबद्दल कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर मोदी सरकार हमीभाव कायद्यात अंतर्भूत असल्याचा शब्द देत आहे. मात्र सरकार हे शब्दांनी नाही तर कायद्याने चालते, त्यामुळे कायद्यात हमीभावाचे आश्वासन असायला पाहीजे होते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
शरद पवारांचे ते पत्र १६५ पानांचे..
भाजपकडून आता पवार यांच्या ज्या पत्राचा उल्लेख करण्यात येत आहे, ते पत्र १६५ पानांचे आहे. मात्र जाणीवपूर्वक त्यातील दोनच पाने व्हायरल केली जात असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. पवारसाहेबांनी राज्यांना लिहिलेले पत्र हे सूचक होते, ते निर्देश नव्हते. एपीएमसीचे अधिकार केंद्राकडे घेण्यास पवार साहेब कधीही तयार नव्हते अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना
- खुशबू, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने सोडली कॉंग्रेसची साथ
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भारताच्या अंतर्गत मुद्यावर पाकिस्तानने खुपसलं नाक; शेतकरी आंदोलनावरून पाकिस्तानी मंत्र्याची मोदी सरकारवर टीका !
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

