पुणे : दलित पँथर्स ऑफ इंडियाच्या वतीने आज सोमवारी गॅस, इंधन दरवाढ, महागाई व वीजबिल सक्तीची वसुलीविरोधात पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर ‘धिक्कार जन आंदोलन’ करण्यात आले. सरकारकडून लवकरात लवकर नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालावा, तसेच महाराष्ट्र सरकारने या बाबींचा फसवा कारभार थांबवावा अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ईलियास शेख यांच्या आयोजनातून हे आंदोलन पार पडले.
कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे मजुरी व व्यवसाय मंदावले आहेत. तर दुसरीकडे महागाई उच्चांक गाठत आहे. या सर्व परिस्थितीला सर्वसामान्य जनता त्रस्त होत आहे. पेट्रोल, डिझेलने शतक पुर्ण केले. तर राज्यातील वीज ग्राहकांकडून सक्तीची बील वसूली करून जनतेवर अत्याचार करत आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडून जखम झाली आहे. सरकारकडून मदतीरुपी मलमाची अपेक्षा होती. परंतू त्याउलट सरकारने महागाई वाढवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे सरकारने तत्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- ‘बेळगाव प्रश्नी काही लोकांचा अनावश्यक हस्तक्षेप’, कुमारस्वामींनी शिवसेनेला डिवचले
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
