बीड : इस्लाम धर्माच्या पवित्र अशा कुरआनमध्ये बदल करून त्यातील २६ आयात वगळा, अशी मागणी करून तमाम समाज बांधवांच्या भावना दुखविणाऱ्या वसीम रिझवी विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने ही तक्रार दिली आहे. रिझवीविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवा, अशी मागणी केली आहे.
बीड शहर पोलीस ठाण्यात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर यांच्यासह नूरलाला खान, मुसा खान यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ११ मार्च रोजी लखनऊ उत्तर प्रदेश येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
यात इस्लाम धर्माच्या सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुरआनमध्ये बदल करून त्याच्यात असलेल्या आयातमधून एकूण २६ आयात वगळण्यात यावीत, अशी मागणी केली. सुप्रीम कोर्ट रिझवीची ही याचिका दाखल न करता फेटाळून लावेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. मात्र, वसीम रिझवी याने याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांना बोलताना इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे वसीम रिझवी विरोधात गुन्हा दाखल करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी


