मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा वाढणार अशी लक्षणे आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. तसेच गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, भगव्या फलकास काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर प्रत्युत्तरात कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले होते. ज्या प्रकारे बेळगावमध्ये कर्नाटक भाजपाप्रणित एक संघटना आहे, ते आमच्या मराठी लोकांवर ज्याप्रकारे हल्ले करत आहेत. आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती. यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शिवसेनेला टोला लगावत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Why are Maharashtra people unnecessarily interfering into boundary issue (Belagavi)?Issue was over long back. Common people are facing trouble. Why is our state govt bringing PM's name to interfere? Nobody can interfere according to me: Ex Karnataka CM & JDS leader HD Kumaraswamy pic.twitter.com/PLs0ZyIYEX
— ANI (@ANI) March 15, 2021
‘बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं अनावश्यक हस्तक्षेप का करीत आहेत? हा मुद्दा फार पूर्वीपासून होता. सामान्य लोकांना त्रास होत आहे. आमचे कर्नाटक राज्य सरकार पंतप्रधानांचे नाव हस्तक्षेप करण्यासाठी का आणत आहे? माझ्या म्हणण्यानुसार कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.’ असे जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बेळगाव सीमाभागात कर्नाटक सरकारच्या पोलिसांची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. मराठी भाषिक तरुणांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवले म्हणून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील मच्छे गावातील हे चार तरुण आहे. या चारही तरुणांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवले होते. ‘मराठी भाषिक वाघ आहे’ असे स्टेट्स होते. या चारही तरुणांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून कानडी पोलिसांनी जाब विचारला आणि बेदम मारहाण केली.
पाठ, हात आणि पायांवर बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे वर्ण तरुणांच्या अंगावर उमटले आहे. कानडी पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार? असा संतप्त सवाल स्थानिक मराठी भाषिक नागरिक विचारत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

