Share

‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक

Published On: 

बीड : कौन बनेगा करोडपती २५ लाखांची लॉटरी लागल्याचे भासवून भामट्यांनी एका तरूणाला १ लाख १२ हजार ५०० रूपयांचा गंडा घातला. मागील आठवड्यात फसवणुकीचा हा प्रकार घडला असून शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शाहूनगर येथील रोहित प्रकाश राठोड याला १० रोजी रात्री अज्ञात भामट्याने कॉल करून केबीसीचा मॅनेजर असल्याची बतावणी केली आणि तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. रोहितकडून विविध कागदपत्रे जमा करून घेण्यात आली.

त्यानंतर जीएसटी, तिकीट, खाते काढणे अशी विविध कारणे सांगून रोहितकडून १ लाख १२ हजार ५०० रूपये उकळण्यात आले आणि सोमवारी खात्यावर लॉटरीचे पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानंतर भामट्यांनी फोन उचलणे बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे रोहितच्या लक्षात आले. रोहितच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

विवाहितेची आत्महत्या, सासरच्या तिघांवर गुन्हा
विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी बीड शहरातील अंबिका चौक परिसरातील पोस्टमन कॉलनी भागात घडली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. मारोती किसन टकले (रा. बटेवाडी, ता. जामखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी सविता संतोष सुळे (२५) हिचा सासरच्या मंडळींनी छळ केल्याने छळाला कंटाळून तिने शनिवारी घरातच फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पती संतोष भगवान सुळे, दीर योगेश भगवान सुळे व सासू विजूबाई भगवान सुळे यांच्याविरोधात ठाण्यात तक्रार दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!