बीड : परळी येथील शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती- २०१८ संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी मंत्री मुंडे यांचा सत्कार केला.
यावेळी बार्टीच्या माध्यमातून बीएएनआरएफ-२०१८ ही फेलोशिप महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात एम.फिल करणाऱ्या अनुसूचित जातीच्या पात्र १८६ संशोधक विद्यार्थ्यांना सध्या दिली जात आहे. ती आता एमफिल ते पीएचडी अशी नियमित यूजीसीच्या ‘आरजीएनएफ’ फेलोशिपप्रमाणे पाच वर्षे देण्यात यावी, अशी मागणी करत निवेदन दिले.
याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निवेदनावर पुणे येथील बार्टीचे महासंचालक यांना ‘अ’ प्रमाणे तत्काळ तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. मागील वर्षी समितीच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केल्यामुळे एम.फिल व पीएच.डीच्या ४०८ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केल्याबद्दल समितीच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- धोक्याची घंटा; मराठवाड्यात २ हजार ४६७, विदर्भात ४ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

