Share

“सिद्धूसारख्या अस्थिर मनाच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवून…”, संजय राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपने चार राज्ये सहज जिंकली. त्यातले उत्तर प्रदेश जिंकल्याचा जल्लोष आजही सुरूच आहे. पण सीमेवरील पंजाब राज्यात भाजपचे संपूर्ण पानिपत का झाले? त्यावर कोणीच बोलत नाही. ‘आप’ने दिल्ली ते पंजाब हातपाय पसरले. गोव्यात ते शिरले. हे चित्र काय सांगते?, असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या सामना रोखठोकच्या माध्यमातून पाच राज्यांच्या निवडणूक निकाला संदर्भात भाष्य केले आहे. तसेच सिद्धूसारख्या अस्थिर मनाच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवून काँग्रेसने स्वतःच पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘भारतीय जनता पक्ष पाच राज्यांतील विजय साजरा करीत आहे, पण त्यांनी आहे ते फक्त राखले. नवे काय मिळवले? उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये त्यांचे राज्य होते, ते राखले. पंजाबात त्यांचा दारुण पराभव झाला व जेमतेम दोन जागा ते जिंकू शकले. येथे केजरीवाल व ‘आप’समोर श्री. नरेंद्र मोदी व शहा टिकू शकले नाहीत. पंजाबात सत्ताधारी काँग्रेसने स्वतःचा पराभव स्वतःच घडवून आणला. सिद्धूसारख्या अस्थिर मनाच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवून काँग्रेसने स्वतःच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. उत्तराखंडमध्ये हरीश रावत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारच पराभूत झाले. भाजपचा उत्तराखंडात विजय झाला. पण मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे पराभूत झाले. जिंकलेल्या राज्याचा सेनापतीच पराभूत होतो तसे हे घडले. आता पुढील काळात उत्तराखंडात भाजपविरोधात नाराजी होती. पण हरीश रावत या वृद्ध नेत्याच्या हट्टापुढे बरेच काही गमवावे लागले. आता पुढील काळात जुन्या नेत्यांच्या विळख्यातून काँग्रेसची सुटका करणे हे मोठे काम गांधी बहीण-भावांसमोर आहे.’

दरम्यान, पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमधील ‘जी 23’ हा जुन्यांचा गट पुन्हा उसळी मारेल. काँग्रेसचे चांगले होऊ नये अशी प्रार्थना करणारे लोक काँग्रेसमध्येच आहेत. काँग्रेस बरखास्तीचा विचार गांधीजींनी 1947 मध्ये मांडला. तो अमलात आणायची जबाबदारी या ‘जी 23’ वाल्या मंडळींनी घेतलेली दिसते. पंजाब भाजपकडे नव्हते, पण ज्या काँग्रेसकडे ते होते ते त्यांनी गमावले आहे. देशाच्या सीमावर्ती राज्यात ‘आप’सारख्या पक्षाने बहुमत मिळवणे हा राष्ट्रीय पक्षाचा पराभव आहे. अत्यंत संवेदनशील असे हे राज्य. दिल्लीच्या केंद्रशासित राज्यावर ‘राज्य’ करणे व पंजाबचा सुभा सांभाळणे यात फरक आहे. दुसरे म्हणजे स्वतः केजरीवाल हे अर्धवट राज्याचे मुख्यमंत्री. त्यांच्याकडे गृह, अर्थ यासारखी खातीच नाहीत. उलट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मान मोठा असेल. त्यांच्या हातात स्वतःचे पोलीस दल असेल. त्याचा गैरवापर दिल्लीच्या राजकारणात होऊ नये इतकेच, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!