Share

संजय राऊतांच्या टीकेवर राज ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले,“त्यांनी आता एकांतात…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांची नक्कल करून दाखवली. तद्पश्चात यावर प्रतिक्रिया देत आमचं राजकारण नकलांवर उभं नाही, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊतांच्या या टोमण्याला आता राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

काल (१२ मार्च) दिवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळील मुख्य बाजारपेठेतील एका गृहसंकुलात मनसेच्या दिवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. तद्पश्चात राज ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांच्या प्रतिक्रियेसंदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले की,‘संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी.’

दरम्यान, ‘नक्कल केली चांगील गोष्ट आहे. नक्कल मोठ्या माणसांची करतात. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे. ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे,’ असे राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!