Share

Breaking News : नितेश आणि निलेश राणेंवर गुन्हा दाखल; शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याचा वाद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेले आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या अंगलट येण्याची चिन्हं दिसून येत आहेत. कारण, यासंदर्भात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि निलेश राणें विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणे राणे कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेत बोलत असतांना निलेश राणे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असे वक्तव्य केले होते. तसेच आझाद मैदानातील मोर्चादरम्यान नितेश राणेंनी देखील शरद पवारांवर टीका केली होती.

दरम्यान, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात निलेश आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुरज व्यंकटराव चव्हाण यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!