मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या सामना रोखठोकच्या माध्यमातून पाच राज्यांच्या निवडणूक निकाला संदर्भात भाष्य केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक मग बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे सर्व प्रश्न निवडणुकीपुरते विसरून जातात,असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी वाहत होते. तरीही भाजपास मतदान झाले. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहतो व त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक मग बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे सर्व प्रश्न निवडणुकीपुरते विसरून जातात.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मोदींप्रमाणेच दुसरे उत्सववीर अरविंद केजरीवाल. ते स्वतःचे व पक्षाचे मार्केटिंग जोरात करतात. कालपर्यंत नास्तिक असलेले केजरीवाल निवडणुकीआधी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतात व आपण हनुमान भक्त असल्याचा प्रचार करतात. केजरीवाल यांच्या दिल्ली राज्यात त्यांनी चांगले काम केले. विजेपासून पाण्यापर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत सर्वच फुकट दिले. हीच फुकटेपणाची आश्वासने त्यांनी पंजाबच्या जनतेला दिली, पण पंजाबातला सगळ्यात मोठा प्रश्न शेवटी शेतकरी व कायदा-सुव्यवस्थेचा राहील. मुख्यमंत्री भगवंत मान तो कसा हाताळणार? पंजाबात आता काँग्रेस दुर्बल झाली व अकाली दल नगण्य ठरले. संवेदनशील सीमावर्ती राज्यातले हे चित्र बरे नाही’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “…पण पंजाब राज्यात भाजपचे संपूर्ण पानिपत का झाले?”, संजय राऊतांचा खोचक सवाल
- “सिद्धूसारख्या अस्थिर मनाच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवून…”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच भगवंत मान यांनी केली पहिली कारवाई!
- फडणवीसांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार; भाजपचा आक्रमक पवित्रा
- ‘3 इडियट्स’च्या ‘सायलेन्सर’ने 13 वर्षात बदलला आपला संपूर्ण लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

