🕒 1 min read
औरंगाबाद : शासन मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांवर खर्च करत आहेत. परंतु जि.प. प्रशासनाने किरकोळ खर्चासाठी असलेले आरोग्य आणि दुरुस्त झालेले उपआरोग्य केंद्र धुळखात पडले आहे. या केंद्रांमध्ये ओल्या पार्ट्यांची मेजवानी होत असून, तिथे मोकाट मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर असतो. आरोग्य केंद्राच्या भिंती नुसत्याच शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. गावात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करा, डॉक्टर नर्सची सुविधा द्या अशी आक्रमक शब्दात जिल्हा परिषद सदस्य असलेल्या पुष्पा काळे, हिंदवी खंडागळे, उषा हिवाळे यांनी मागणी केली आहे.
दहा महिन्यानंतर खुल्या सभागृहात गुरुवारी औरंगाबाद जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. दरवेळी पुरुष सदस्यांच्या आवाज दबलेला महिला सदस्यांचा आवाज यावेळी मात्र आक्रमक होता. नेहमीच महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. गोरगरीब गावकऱ्यांना त्यांच्या स्वास्थ संबंधी उपचारांसाठी आरोग्य केंद्रांचा आधार असतो. परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष या आरोग्य केंद्रांकडे आहे. शासनाचे कोट्यावधी रुपये आरोग्यासाठी खर्च होत आहेत. परंतु किरकोळ खर्चाचे कारण पुढे करत तयार असलेले आरोेग्य केंद्र जि.प. प्रशासन आणि आरोग्य विभागाने ताब्यात घेतलेले नाहीत. असा आरोप सदस्य मधुकर वालतुरे यांनी केला.
रेखा नंदुरकर आणि ज्योती चोरडिया यांनी आरोग्य केंद्रात साथ रोगांचा प्रादुर्भाव पाहता अत्याधुनिक सुविधा देता येवू शकत असतांनाही आरोग्य विभाग दुर्लक्ष का करतो आहे. आरोग्य विभागाचे आणि आरोग्य केंद्रांचे ऑडिट व्हायला हवेत अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आरोग्याबाबत हलगर्जीपणा होता कामा नये. म्हणून स्ट्रक्चरल ऑडिटी वेळेत झालेच पाहिजे असे आदेश वारंवार देण्यात आलेले असतांना आणि आरोग्य केंद्रांच्या बांधकामात त्रुटी आहेत. अशा तक्रारी आलेल्या असतांना देखील २०१८ पासून स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. असा आरोप विजय चव्हाण यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- तब्बल ५.६२ लाख भारतीयांचा डेटा चोरी कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात CBI कडून गुन्हा दाखल
- वाई न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार : नाना पटोले
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
