🕒 1 min read
नवी दिल्ली : संगणकीकृत किंवा डिजिटल माध्यम जितकी अधिक फायद्याची आहेत तितकाच त्यापासून ग्राहकांच्या माहितीला निर्माण होणारा धोका देखील मोठा आहे. याची अनेक उदाहरणं वेळोवेळी सायबर क्राईमच्या माध्यमातून समोर येतात. वेगवेगळ्या संकेतस्थळांवर ग्राहकांनी नियम व अटी यांच्या नावाखाली दिलेली माहिती चोरून विकली जात असल्याच्या अनेक घटना घडतात. तर आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ब्रिटनची कंपनी असलेल्या कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
५.६२ लाख भारतीय फेसबुक युझर्सचा डेटा चोरी केल्याचा आरोप या कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात ग्लोबल सायन्स रिसर्चविरोधातही सीबीआयकडून कारवाई सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. फेसबुक-कँब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली होती. ग्लोबल सायन्स रिसर्चने बेकायदा पद्धतीने ५.६२ लाख भारतीय फेसबुक युझर्सचा डेटा गोळा केला आणि कॅब्रिज अ;ॅनालिटिकाला दिला, असे उत्तर सोशल मीडिया कंपनीने सीबीआयला दिले होते. या डेटाचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मार्च २०१८ च्या दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी कँब्रिज अ;ॅनालिटिकाचे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांच्या आधारे पाच कोटीपेक्षा जास्त युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय फेसबुक प्रोफाइलवरून चोरल्याच्या बातम्या दिल्या होत्या. सुरुवातीला यामध्ये कँब्रिज अॅनालिटिकाने भारतीयांचा डेटा नसल्याचे सांगितले होते. मात्र, यानंतर ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक डेटा घेतल्याची कबुली कंपनीकडून देण्यात आली. या प्रकरणी आता सीबीआयकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तर नुकतच व्हॉट्सऍपच्या नवीन पॉलिसी वरून जगभरातून टीका होत होती. ग्राहकांच्या माहितीचा वापर करण्याची परवानगी द्या नाही तर सेवा बंद करणे ही एक जबरदस्ती असल्याचं बोललं जात होत. यावर व्हॉट्सऍपने स्पष्टीकरण देखील दिले होते त्यांनतर आता व्हॉट्सअ;ॅपने आपली प्रायवसी धोरण मागे घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !
- वाई न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- तुमच्या ट्विटर अकाऊंट मध्ये होणार ‘हा’ बदल…
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
