मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझे प्रकरणात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामो़डी समोर येत आहे. यातच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीन्याम्याची मागणी विरोधकांनी जोर धरून ठेवली आहे. याबाबतचे पडसाद आज संसदेतही दिसून आले. खासदार गिरीश बापट, खासदार नवनीत राणा आणि खासदार पुनम महाजन यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत निलंबित केलेल्या सचिन वाझेंची पुनर्नियुक्ती का केली? असा सवाल उपस्थित केला. तर पूनम महाजन या प्रकरणी म्हणाल्या की, परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. तर शिवसेनेला का मिरच्या झोंबत आहेत ?
‘पोलीस अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांकडूनच खंडणी वसुलीचं टार्गेट दिलं जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्यांचा आशार्वाद आहे. अशावेळी जनतेने कुणाकडे पाहावे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ अशी मागणी गिरीश बापट यांनी केली.
मात्र यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीची बाजू लावून धरत महाराष्ट्रात भाजप सरकार आणण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू असल्याची टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी
- जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती; हे मिम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही !
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- …म्हणून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पवारांची ठाम भूमिका


