Share

सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना हा भावनिक राजकारणाचा भाग नाही ना?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे  देशात आणि राज्यात याची पडसाद उमटू लागले आहेत. समाज स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. या घटने संबंधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी या घटनेचा निषेध करत संशय व्यक्त केला आहे.

ज्यांना कधी सावरकर समजलेच नाही, काँग्रेसने नेहमी स्वातंत्रवीरांचा अपमान केला आहे. अभाविप ने सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांचा ही पुतळा बसवला होता हा फक्त सावरकरांचा अपमान नाही तर स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ABVPने दिली आहे. तर दुसरीकडे शर्मिला येवले यांनी संशयी प्रतिक्रिया दिली आहे.

देशाच्या आर्थिक परिस्थिती विदारक असताना लोक अडचणी असताना लोकांच्या प्रश्नावरचे लक्ष काढून घेत. भावनिक मुद्द्यावर गेली ५ वर्ष जे काही राजकारण केलं जातं आहे त्याच तर हा भाग नाही ना अशीच शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तर सावरकरांच्या किंवा कोणत्या ही राष्ट्रीय महापुरुषाच्या, समाजसुधारकच्या,महान नेत्याच्या पुतळ्याला काळ फासने किंवा त्यांना चप्पलाचा हार घालणं या कृतीचा निषेधच नोंदवायला पाहिजे पण ते नेमक कोण करत हे पण बघणं गरजेचं आहे आणि का करत हे पण बघायला पाहिजे, असे ही त्या म्हणाली आहेत.

दरम्यान दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी विंग असणाऱ्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या गुंडांनी गुरूवारी काळे फासले असल्याची घटना घडली आहे. एनएसयूआयचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या अक्षय लकराने हे संतापजनक कृत्य केले आहे. एका बाजूला सोशल मिडीयावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!